दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात महिला उमेदवाराचे तळीरामांना अनोखे आश्वासन


चंद्रपूर : निवडणुकी दरम्यान कोणता उमेदवार काय आश्वासन देईल हे काही सांगता येत नाही. अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात थेट तळीरामांच्या भावनेलाच हात घातला. त्यांनी गाव तिथे बिअर बार ही घोषणा दिली आहे. त्यांनी निवडून आले तर ही घोषणा प्रत्यक्षात आणू असे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर दारूविक्रीचे परवाने बेरोजगार तरूणांना द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. चिमूर मतदारसंघातून वनिता राऊत या निवडणूक लढत असून चक्क त्यांनी अशा आशयाची पत्रके देखील वाटली आहेत. त्यांच्या या अनोख्या घोषणांची आता मोठी चर्चा होऊ लागली असून, त्यांचे पत्रकही सोशल मीडियात चांगले व्हायरल झाले आहे.

काँग्रेसचे सतीश वारजूकर आणि भाजपचे किर्तीकुमार भांगडीया यांच्यात चिमूर मतदारसंघात लढत रंगणार आहे. पण सध्या आपल्या या वेगळ्या आश्वासनामुळे वनिता राऊत या चर्चेत आले आहेत. पण या आश्वासनाला लोक किती प्रतिसाद देतील ते आता २४ ऑक्टोबरला समोर येईल.

थेट दारु विक्रीचे समर्थन अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी केले आहे. चंद्रपुरात दारुबंदी असल्यामुळे गाव तिथे बिअर बार या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्याचबरोबर दारु विक्रीचे परवाने बेरोजगार तरुणांना, सवलतीच्या दरात दारिद्र्य रेषेखालील लोकांना दारु अशा घोषणा देखील त्यांनी केल्या आहेत.

Leave a Comment