सर्वाधिक कर देण्यात देशातील ही शहरे आहेत आघाडीवर


130 कोटींहूनही जास्त आपल्या देशाची लोकसंख्या आहे. पण फक्त 5.65 कोटी लोकांनीच 2019-20 मध्ये कर भरला. अनेक लोकांनी त्यांचा आयकर शून्य दाखवला. शहरांच्या बाबत बोलायचे झाले तर मुंबई शहर कर गोळा करण्यात सर्वात पुढे आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला अशा आणखी देशातील शहरांची माहिती देणार जे सर्वाधिक कर भरतात. शहरांबद्दल जाणून घेऊ.

मायानगरी मुंबई देशात सर्वाधिक कर देणाऱ्या शहरांच्या यादी अव्वल स्थानी आहे. मुंबईमधून 2019 या चालू वर्षात एकूण 3.52 लाख कोटी रुपयांचा कर गोळा करण्यात आला. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा कर 52 हजार कोटी रुपयांनी जास्त आहे.

राजधानी दिल्ली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीकरांनी वित्तीय वर्ष 2019 मध्ये 1.60 लाख कोटी रुपयांचा कर भरला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 31 हजार कोटी रुपयांनी जास्त आहे.

बंगळुरू हे शहर तिसऱ्या स्थानावर असून या शहरातून वित्तीय वर्ष 2019 मध्ये 1.19 लाख कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 17 हजार कोटी रुपयांनी जास्त आहे.

चौथ्या स्थानावर चेन्नई हे शहर आहे. या शहरातून चालु वित्तीय वर्षामध्ये 74 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 8 हजार कोटी रुपयांनी जास्त होता.

हैदराबाद हे शहर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या शहरातून वित्तीय वर्ष 2019 मध्ये 57.3 हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत 9.3 हजार कोटी रुपयांनी जास्त आहे.

Leave a Comment