काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सूचना; पक्षाकडे पैसे नसल्यामुळे कमी करा चहापानाचा खर्च!


नवी दिल्ली : सध्या मंदीचे वातावरण देशात असल्याची चर्चा सुरु असून काही राजकीय पक्षांना देखील या मंदीचा फटका बसत आहे. मंदीचा मोठा दणका देशातील सर्वात मोठा पक्ष असलेला आणि सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाला देखील बसल्याचे दिसत आहे. सध्या आर्थिक अडचणींना काँग्रेस पक्षाला तोड द्यावे लागत आहे. काँग्रेसने सर्व महासचिव, प्रदेशाध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पैसे नसल्यामुळे खर्चावर लगाम घालण्याचे आदेश दिले आहेत.

आर्थिक संकटांना केंद्रातील सत्तेपासून गेल्या पाचपेक्षा अधिक काळ दूर असलेल्या काँग्रेसला तोड द्यावे लागत आहे. काँग्रेस पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व महासचिव, राज्यातील प्रभारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पक्षाने खर्च कमी करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात शुक्रवारी पक्षाच्या अकाऊंट विभागाने अशी सूचनाच दिली आहे. अर्थात हा खर्च कमी करायचा म्हणजे मोठे खर्च कमी करावेत असे नाही तर चक्क चहा आणि नाष्टावर होणारा खर्च देखील कमी करण्यास सांगितले आहे. 30 हजार इतकाच चहा आणि नाष्ट्यासाठीचा महिन्याचा खर्च ठेवण्यास सांगितले आहे. जर यापेक्षा अधिक खर्च झाला तर ते संबंधित व्यक्तीला द्यावे लागतील.

ऑल इंडिया काँग्रेस समितीच्या कॅन्टिनकडून पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चहा आणि नाष्टा दिला जातो. पदाधिकारी त्या बिलावर स्वाक्षरी करून देता आणि ते बिल अकाऊंट विभागाकडून दिले जाते. याबरोबरच कमी अंतराचा प्रवास पक्षातील नेत्यांनी रेल्वेने करावा असे सांगण्यात आले आहे. दौऱ्यासाठी रात्री थांबण्याची गरज नसेल तर हॉटेल बुक करू नये असे देखील पक्षाने म्हटले आहे.

Leave a Comment