रफींच्या मुलाचा घर वाचवण्यासाठी संघर्ष

आपल्या गाण्यांमुळे अनेकांच्या ह्रदयात जागा बनवणारे गायक मोहम्मद रफी यांच्या निधनानंतर 40 वर्षाने आता त्यांच्या मुलाला आपल्या वडिलांचे घर वाचवणे अवघड झाले आहे. बांद्राच्या 28 रोडवरील रफी मॅनश्न 1970 च्या दशकात मोहम्मद रफी यांनी बांधले होते. याच  घरासाठी त्यांचा मुलगा शाहिद रफीला कायदेशील लढाई लढावी लागत आहे.

एचडीएफसी बँकेने न्यायालयात याचिका दाखल करत इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील शाहिदचा प्लॅट ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. 1980 मध्ये रफी यांनी बांधलेला बंगला पाडून इमारत बांधण्यात आली होती. बँकेने दावा केला आहे की, शाहिदने निंबस इंडस्ट्रीज लिमिटेड नावाच्या कंपनीशी प्लॅट विकण्यासंबंधी डील केली होती व कंपनीने प्लॅट खरेदी करण्यासाठी बँकेकडून 4.16 कोटींचे कर्ज घेतले होते. निंबसने पैसे परत न केल्यामुळे बँकेने संपत्तीवर दावा केला आहे.

शाहिदने सांगितले की, फ्लॅटची किंमत जवळपास 5 कोटी रूपये आहे. त्याला फ्लॅट विकायचा नव्हता. मात्र 2017 मध्ये कर्ज देण्यासाठी काही काळासाठी करार करण्यात आला होता. त्याने सांगितले की, कंपनीला जेवढे पैसे देण्यास सांगितले होते, तेवढे दिलेच नाही, त्यामुळे हा करार झालाच नाही.

न्यायालयाने म्हटले आहे की, ही डील रद्द करण्यात आली, याचा अर्थ फ्लॅटची विक्री झाली होती. मात्र डेट रिकवरी ट्राइब्युनलने स्टे देत त्यांना दिलासा दिला आहे. शाहिदने सांगितले की, त्यांच्या नावावर असलेले हे एकमेव घर असून, याच्याशी त्यांच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत.

टेड रिकवरी ट्राइब्युनलने म्हटले आहे की, निंबसकडून या डीलमध्ये त्यांना केवळ 1.95 कोटी रूपये मिळाले असून, डीलमध्ये 3.16 कोटींचा उल्लेख आहे. बँकेच्या वकिलांनी सांगितले की, शाहिद आणि निंबस यांच्यामध्ये करार झाला होता, त्यामुळे संपत्ती जप्त करण्याचा बँकेला अधिकार आहे.

 

Leave a Comment