जपानला 60 वर्षातील सर्वात धोकादायक वादळाचा धोका


60 वर्षातील भयंकर वादळ, हागीबिसमुळे जपानमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आतापर्यंत 42 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, आज वादळ किनारपट्टीवर आदळेल, असा अंदाज आहे. जपानमध्ये ताशी 180 किमी वेगाने वारे वाहत आहेत.

‘हागीबिस’ वादळाच्या प्रभावामुळे टोकियोची राजधानी गुलाबी व जांभळी झाली आहे. या वादळाचे फिलिपाइन्सने नाव हागीबिस ठेवले आहे. या भाषेमध्ये याचा अर्थ वेग आहे. दरम्यान 1958 साली जपानमध्ये अशाच वादळामुळे मोठी हानी झाली होती.

त्यावेळी तीव्र वादळामुळे 1200 लोक ठार आणि हजारो बेघर झाले होते. 180 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कहर सुरू झाला आहे. वाऱ्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर उलटली. एका व्यक्तीच्या मृत्यूची बातमीही आहे.

पूर आणि दरडी कोसळण्याच्या भीतीने जपान सरकारने किनारपट्टीचे क्षेत्र रिकामे केले आहे. सर्व हवाई सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत. जपानी कंपन्यांनी 1929 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत. रेल्वेचे नेटवर्कही बंद झाले आहे. लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

जनतेने जागरुक राहण्याचे आवाहन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले आहे. सरकारने आपत्कालीन सेवा हाई अलर्टवर ठेवल्या आहेत. जपानमधील रग्बी विश्वचषकाचे सर्व सामने देखील रद्द करण्यात आले असून खेळाडूंना परत पाठविण्यात आले आहे.

Leave a Comment