भारताच्या या युवा खेळाडूने ठोकले सर्वात जलद दुहेरी शतक

युवा विकेटकिपर संजू सॅमसनने विजय हजार ट्रॉफीमध्ये धमाकेदार फलंदाजी करत दुहेरी शतक ठोकले आहे. सॅमसन विजय हजारे स्पर्धेतील या सीझनमध्ये दुहेरी शतक ठोकणारा पहिला खेळाडू असून, लिस्ट-ए मध्ये सर्वात जलद दुहेरी शतक लगावण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.

सॅमसनने धुवाधार फलंदाजी करताना 125 चेंडूमध्येच 200 धावा पुर्ण केल्या.भारताकडून प्रथम श्रेणीमध्ये दुहेरी शतक ठोकणारा सॅमसन सहावा खेळाडू आहे. तर डोमेस्टिक क्रिकेटमधील हे तिसरे दुहेरी शतक आहे.

आपल्या या डावात सॅमसनने 129 चेंडूचा सामना करताना 20 चौकार व 10 षटकारंच्या साह्याने 212 धावांची खेळी केली. यावेळी त्याचा स्ट्राइकरेट 162.99 होता. दुहेरी शतक ठोकतानाचा हा भारतीय खेळाडूचा सर्वोत्तम स्ट्राइकरेट आहे. संजू सॅमसनचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे पहिलेच शतक होते, ज्याचे त्याने दुहेरी शतकात रूपांतर केले.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकण्याऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, करनवीर कौशल आणि आता संजू सॅमसनचा समावेश झाला आहे.

सॅमसनने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तर 2015 मध्ये झिम्बाम्बे विरूध्द टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Leave a Comment