गॅलेक्सी सोडून दुसऱ्या जागी रहाणार भाईजान

बॉलिवुड अभिनेता सलमान खान लवकरच आपले घर गॅलेक्सी अपार्टमेंट सोडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्याची शक्यता आहे. त्याचे नवीन घर बांद्राच्या चिंबई येथे बनत आहे आणि येथे काम देखील सुरू झाले आहे.

रिपोर्टनुसार, सलमान खानला काही दिवसांपुर्वीच बांद्राच्या चिंबई भागात पाहण्यात आले होते. सलमान मागील अनेक दिवसांपासून एक नवीन घराचा शोध घेत आहे.

सलमानचे वडिल सलीम आणि आई सलमा खान यांनी 2011 मध्ये 4000 स्केअर फूट प्रॉपर्टी खरेदी केली होती. या प्रॉपर्टीची किंमत किंमत 14.4 कोटी रूपये आहे. बीएमसीकडे जो नकाशा पास करण्यासाठी पाठवला आहे. त्यानुसार, सलमान आणि त्यांचे कुटुंब येथे ग्राउंड प्लस फाइव्ह स्टोरी बिल्डिंग बनवणार आहेत.

नकाशामध्ये बीएमसीकडे जी परवानगी मागितली आहे त्यात ग्राउंड फ्लोरवर फॅमिली रूम, पँट्री आणि एंट्रेस लॉबी असेल. वरील पाच मजल्यांवरती प्रत्येक फ्लोवर दोन बेडरूम असतील. दोन बेसमेंट पार्किंगमध्ये 16-16 कार ठेवण्याची जागा असेल.

सलमान सध्या रियालिटी शो बिग बॉसमुळे चर्चेत आहे. याचबरोबर त्याचा दंबग-3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Leave a Comment