महाबलीपूरमच्या समुद्र किनारी मोदींचे स्वच्छता अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली आहे.  ते स्वतः अनेकवेळा सफाई करताना दिसतात. काल त्यांच्या साफ-सफाईचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी समुद्र किनाऱ्यावरील कचरा उचलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान मोदी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी कचरा दिसल्यावर त्यांनी स्वतः सफाई करण्यास सुरूवात केली. व्हिडीओ शेअर करत मोदींनी लिहिले की, आज सकाळी ममल्लापूरमच्या (महाबलीपूरम) समुद्र किनारी सफाई केली. हे काम 30 मिनिटे केले. जमा केलेला कचरा हॉटेलचा कर्मचारी जयराजकडे सोपवला. सार्वजनिक ठिकाणी सफाई राहिल या गोष्टीकडे लक्ष द्या.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या अनौपचारिक भेटीसाठी महाबलीपूरम येथे आहेत. जिनपिंग हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

Leave a Comment