इतिहास जमा होणार मुंबईची आयकॉनिक ‘काली-पिली’ टॅक्सी

मुंबई मायानगरीच्या रस्त्यावर धावणारी काली-पिली टॅक्सी आता रस्त्यावरून गायब होणार आहे. मुंबईची शान असलेली ही पद्मिनी टॅक्सी आता बंद होणार आहे. या आयकॉनिक इंडो-इटालियन पद्मिनी टॅक्सीचे मॉडेल वर्ष 2000 मध्येच बंद झाले होते. त्यानंतर केवळ 50 टॅक्सीच रस्त्यावर धावताना दिसत आहेत. मात्र जून 2020 पासून या गाड्यावर पुर्णपणे रस्त्यावर धावताना दिसणार नाहीत.

मुंबई टॅक्सी युनियनने याबद्दल म्हटले की, ही प्रतिष्ठित कार आहे. मात्र नवीन पिढीतील युवक या टॅक्सीमध्ये बसणे पंसद करत नाही. त्यांना नवीन मॉर्डन टॅक्सीमध्ये बसणे आवडते. एवढ्या महागाईमध्ये या टॅक्सींची काळजी घेणे देखील अवघड झाले आहे.

वर्ष 1964 मध्ये फिएट 1100 डिलाइट नावाने पहिल्यांदा ही टॅक्सी बाजारात आणण्यात आली होती. लाँचिंगनंतर एक वर्षाने याचे नाव बदलून प्रिमियर प्रेसिंडेट ठेवण्यात आले होते. 1974 मध्ये पुन्हा एकदा टॅक्सीचे नाव बदलून प्रिमियर पद्मिनी ठेवण्यात आले. भारतीय राणी पद्मिनीच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले होते.

90 च्या दशकात 63 हजार 200 पद्मिनी टॅक्सीचे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटमध्ये रजिस्टरेशन झाले होते. 2013 मध्ये वाढत्या प्रदुषणामुळे 20 वर्ष जुन्या वाहनांवर प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे ही टॅक्सी आता बंद करावी लागणार आहे. 55 वर्ष मुंबईच्या रस्त्यांवर राज्य करणारी ही काली-पिली पद्मिनी टॅक्सी आता धावताना दिसणार नाही.

 

Leave a Comment