अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या मंजू राणीची धडक


उलान-उदे (रशिया) – भारताच्या मंजू राणीने रशियात सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मंजूने उपांत्य फेरीत थायलंडच्या सी.सक्सरतवर ४-१ ने मात केली. भारताची महिला बॉक्सर तब्बल १८ वर्षांच्या कालावधीनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत पोहचली असल्यामुळे मंजू राणीकडून अंतिम फेरीत भारताला सुवर्णपदकाच्या आशा वाढलेल्या आहेत.

उपांत्य फेरीत भारताच्या मेरी कोमला पराभवाचा सामना करावा लागला. ६ सुवर्णपदके जिंकणाऱ्या मेरी कोमला सातवे सुवर्णपदक मुकावे लागले. टर्कीच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने ५१ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. पण भारताच्या मंजू राणीने ४८ किलो वजनी गटात पदकाची आशा कायम ठेवली आहे.

Leave a Comment