2 तासांच्या आत मॅरेथॉन पुर्ण करत धावपटूने रचला इतिहास

केनियाचा दिग्गज धावपटू इलियूड किपचोगेने इतिहास रचला आहे. त्याने दोन तासांपेक्षा कमी वेळेत मॅरेथॉन पुर्ण करण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच धावपटू आहे. 34 वर्षीय किपचोगेने एक तास 59 मिनिटे आणि 40 सेंकदामध्ये मॅरेथॉन पुर्ण केली. हा अधिकृत मॅरेथॉन विक्रम नाही, कारण ही कोणतीही ओपन स्पर्धा नव्हती. किपचोगेने रोटेटिंग पेसमेकर्सचा उपयोग केला.

ऑस्ट्रियातील  व्हिएन्न येथे ही मॅरेथॉन पार पडली. केनियाच्या या धावपटूच्या मदतीसाठी 42 पेसमेकर्स होते. यामध्ये 1500 मीटर ऑलिपिंक चॅम्पियन मॅथ्यू सेंट्रोविट्ज, ओलिंपिक 5000 मीटर रौप्य पदक विजेता पॉल चेलिमो आणि इंगेरब्रिजट्सेन जॅकब, फिलिप आणि हेनरिक यांचा समावेश होता. पुर्ण मॅरेथॉन दरम्यान किपचोगेच्या प्रशिक्षकांनी त्याला बाईकवरून पाणी पोहचवले.

विक्रम केल्यानंतर किपचोगेने आनंदाने आपल्या पत्नीला मिठी मारली.

2017 मध्ये याच मॅरेथॉनवेळी ऑलिंपिक चॅम्पियन असलेल्या किपचोगेचा 25 सेंकदाने विक्रम करण्यापासून लांब राहिला होता. 2018 मध्ये त्याने बर्लिन मॅरेथॉन 2 तास 1 मिनिटे 39 सेंकदात पुर्ण केली होती.

 

Leave a Comment