हिरोची ही 16 वर्ष जुनी प्रसिद्ध बाईक घेणार निरोप


नवी दिल्ली – कधी काळी तरुणाईच्या आवडती बाईक असलेली हिरो मोटोकॉर्पची पहिली प्रीमियम मोटरसायकल हिरो करिज्माचे उत्पादन कंपनी बंद करु शकते. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीने या बाईकचे एक युनिटदेखील तयार केलेले नाही.

2003 मध्ये जेव्हा करिझ्मा लॉन्च करण्यात आली तेव्हा हीरो मोटोकॉर्पऐवजी हीरो होंडा ही कंपनी होती, त्यावेळी ही बाइक प्रीमियम बाईकमध्ये मोजली जात होती. त्यावेळी या बाईकचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर हृतिक रोशन होता. त्याकाळी हृतिकचा ‘कोई मिल गया’ हा चित्रपट हिट झाला होता आणि तो एक उदयोन्मुख स्टार होता. हृतिकने करिज्माची जाहिरात “जेट सेट गो” टॅगलाइनद्वारे केली होती, ज्यात करिज्माची गती आणि शक्ती दर्शविली गेली होती. त्यावेळी ती तरुणांची आवडती बाईक होती.

अहवाल नुसार, नवीन उत्सर्जन मानक बीएस -6 पुढील वर्षी एप्रिल 2020 पासून अंमलात येणार आहे आणि करिज्मा नवीन मानकांची पूर्तता करीत नाहीत. करिज्माचे इंजिन बीएस -6 मध्ये श्रेणीसुधारित करणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, अर्थात सियाम यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, करिज्माचे एकही एक युनिट एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत तयार केले गेले नाही.

तथापि, या वर्षाच्या सुरूवातीला कंपनीने करिज्माचे उत्पादन बंद करणार नाही त्याचबरोबर परदेशात तिचे निर्यात सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर, मागील सहा महिन्यांत या बाईकचे एकही युनिट निर्यात केले गेले नाही. या बाईकमध्ये 200 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले गेले आहे, जे 8000 आरपीएम वर 20 बीएचपी आणि 6500 आरपीएमवर 19.7 एनएम टॉर्क जनरेट करते. बाइकचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्समध्ये आले आहे. दुचाकीच्या सिंगल टोनची किंमत 1.08 लाख रुपये होती तर ड्युअल टोन शेडची किंमत 1,10,500 लाख रुपये होती.

त्याचबरोबर, कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात त्यापैकी 314 युनिट्सचे उत्पादन केले, जे या आर्थिक वर्ष 2019 मध्ये कमी होऊन 138 युनिट्सवर आले आहे. त्याचबरोबर निर्यातही घटून 80 युनिट्स झाली. परंतु 2009 मध्ये जेव्हा यामाहाने स्पोर्ट्स बाईक आर 15 बनविणे सुरू केले तेव्हा करिज्माची क्रेझ लोकांमध्ये कमी झाली, त्यानंतर कंपनीने करिज्मा झेडएमआर लाँच केली होती.

Leave a Comment