चक्क अंर्तवस्त्रातून 29 लाखांची सोन्याची तस्करी करणाऱ्याला विमानतळावर अटक

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने लपवून आणणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती अंडरवेअरमध्ये लपवून 804 ग्रॅम सोने घेऊन येत होता. या सोन्याची किंमत 29 लाखांपेक्षा जास्त आहे. कस्टम विभागानुसार, आरोपी भारतीय प्रवासी दोहावरून 9 ऑक्टोंबरला परतला होता.

त्याला विमानतळावरील टर्मिनल 3 येथे पकडण्यात आले. या आरोपीच्या विरोधात कस्टम अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आलेली आहे.

याआधी देखील दिल्लीत म्यानमारच्या दोन महिलांना अटक करण्यात आली होती. थायलंडवरून येणाऱ्या या महिलांकडून 1 कोटींचे सोने जप्त करण्यात आले होते. या महिलांकडे हिरे, माणिक,मोती आणि किंमती दगड सापडले होते. या सर्वांची किंमत 1.39 कोटी रूपये होती.

Leave a Comment