नवीन लूकमध्ये दाखल होणार हिरो स्प्लेंडर

हिरो मोटोकॉर्प आपली लोकप्रिय बाईक स्प्लेंडर नवीन लूकमध्ये लवकरच बाजारात आणणार आहे. या नवीन बाईकमध्ये कंपनी काही खास फीचर्सचा समावेश करणार आहे. याचबरोबर मायलेज वाढवण्यासाठी देखील एका खास फीचरचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

कंपनी जूनमध्ये बीएस6 स्प्लेंडर iSmart वरील पडदा हटवला होता. मात्र त्यावेळी या बाईकच्या स्पेसिफिकेशनविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती. मात्र आता लाँचच्या आधी बाईकचे स्पेसिफिकेशन ऑनलाईन लीक झाले आहेत.

(Source)

लीक झालेल्या माहितीनुसार, नवीन स्प्लेंडर आयस्मार्टमध्ये 113.2 सीसी इंजिन मिळेल. जे सध्या बाजारात असलेल्या मॉडेल (109.15सीसी) पेक्षा अधिक असेल. याशिवाय मायलेज वाढवण्यासाठी बाईकमध्ये फ्यूल इंजेक्शन टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. नवीन बाईक बीएस6 या इंजिनसोबत येईल.

इंजिनची कॅपिसिटी वाढवण्यात आली असली तरी याची पॉवर सध्या बाजारात असलेल्या बाईकच्या तुलनेत कमी आहे. सध्या बाजार असलेल्या मॉडेलमध्ये 9.5hp पॉवर मिळते. तर नवीन मॉडेलमध्ये 9.1hp ची पॉवर मिळेल.

(Source)

ही नवीन स्प्लेंडर दोन व्हेरिएंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. यामध्ये एक ड्रम आणि दुसरी फ्रंट डिस्क ब्रेक हे मॉडेल असेल. सध्या बाजारात असलेल्या बाईकच्या तुलनेत या बाईकची किंमत 15 टक्क्यांनी अधिक असेल.

बीएस 6 स्प्लेंडर कोणत्या तारखेला लाँच होणार याबाबत कंपनीने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. मात्र या फेस्टिव सीझनमध्ये कंपनी आपली ही लोकप्रिय बाईक लाँच करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment