ब्रँड इंडिया ! भारत आहे जगातील 7 वा सर्वाधिक मुल्यवान देश

जगातील सर्वात मुल्यवान ब्रँड (World Most Valuable Nation Brands) असलेल्या देशांच्या यादीत भारताची दोन अंकानी वाढ होऊन भारत 7 व्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत समावेश असलेल्या टॉप-10 देशांमध्ये भारताच्या ब्रँड वॅल्यूमध्ये 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारताची ब्रँड वॅल्यू आता वाढून 2,56,200 कोटी डॉलर (जवळपास 181 लाख कोटी रूपये) एवढी झाली आहे. जगातील ब्रँड फायनान्सकडून ही यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीमध्य अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

कोणत्याही देशाची ब्रँड वॅल्यू ही त्या देशातील पुढील पाच वर्षांमध्ये सर्व ब्रँडच्या प्रोडक्ट्समध्ये होणाऱ्या विक्रीवरून निश्चित केली जाते.

ब्रँड फायनान्सनुसार, अमेरिका जगातील सर्वाधिक मुल्यावान ब्रँड असणारा देश आहे. याचे अधिकतर मुल्य हे अर्थव्यवस्थेतून येते.  याचबरोबर शिक्षेचा सर्वोच्च स्तर आणि सॉफ्टवेअर उद्योग, मनोरंजन उद्योग याचे देखील मोठे योगदान आहे.

अमेरिकेची ब्रँड वॅल्यू 7.1 टक्क्यांनी वाढून 27,75,100 कोटी डॉलर ( जवळपास 1970 लाख कोटी रुपये) झाली आहे.

जगातील 10 सर्वाधिक मूल्यवान ब्रँड असणाऱ्या देशांची यादी –

  1. अमेरिका – 27,75,100 कोटी डॉलर (1970 लाख कोटी रुपये)
  2. चीन – 19,48,600 कोटी डॉलर (1383 लाख कोटीरुपये)
  3. जर्मनी  – 4,85,500 कोटी डॉलर (344 लाख कोटी रुपये)
  4. जापान – 4,53,300 कोटी डॉलर (321 लाख कोटी रुपये)
  5. युके –  3,85,100 कोटी डॉलर (273 लाख कोटी रुपये)
  6. फ्रान्स – 3,09,700 कोटी डॉलर (273 लाख कोटी रुपये)
  7. भारत – 2,56,200 कोटी डॉलर (181 लाख कोटी रुपये)
  8. कॅनेडा – 2,18,300 कोटी डॉलर (155 लाख कोटी रुपये)
  9. दक्षिण कोरिया- 2,13,500 कोटी डॉलर (151 लाख कोटी रुपये)
  10. इटली – 2,11,000 कोटी डॉलर (149 लाख कोटी रुपये)

 

Leave a Comment