बॉक्स ऑफिसवर ‘द स्काय इज पिंक’ची निराशाजनक कामगिरी

प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरपासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता बघून चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरूवात करेल असे वाटत होते. मात्र बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर चित्रपट काही खास कामगिरी करताना दिसत नाहीये.

द स्काय इज पिंकने ओपनिंग डेवर खराब प्रदर्शन केले आहे. तर एक आठवड्यांपुर्वी रिलीज झालेल्या वॉरची तुफान कमाई सुरू आहे. रिपोर्टनुसार द स्काय इज पिंकने पहिल्या दिवशी केवळ 2.5 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना अनेक आशा होत्या, मात्र चित्रपटाचे कलेक्शन बघून प्रेक्षकांना हा चित्रपट आवडलेला दिसत नाही.

पहिल्या दिवशी चांगली कमाई केली नसली तरी शनिवारी आणि रविवारी या विकेंड डेला चित्रपट कशी कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

या चित्रपटाद्वारे प्रियंकाने बॉलिवुडमध्ये कमबँक केले आहे, तर चित्रपटातील अभिनेत्री जायरा वसीमचा हा शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोसने केले आहे.

Leave a Comment