हार्दिकला भेटल्या नीता अंबानी


टीम इंडिया आणि मुंबई इंडीयन्सचा स्टार ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पांड्या याची लंडन मध्ये मुंबई इंडीयन्स संघाच्या मालक नीता अंबानी यांनी भेट घेतली. हार्दिक याच्या पाठीवर लंडन येथे शस्त्रक्रिया केली गेली असून तो यामुळे किमान सहा महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. गुरुवारी हार्दिकने नीता अंबानी भेटल्याचा फोटो शेअर केला आहे. आणि लंडनला येऊन त्याची भेट घेतल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.

हार्दिक या फोटोसोबत लिहितो, धन्यवाद नीता भाभी. तुम्ही लंडन मध्ये येऊन भेटलात यामुळे खूप चांगले वाटले. तुमच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. तुम्ही नेहमीच आम्हाला प्रेरणा देत आहात.

यापूर्वी हार्दिकने शस्त्रक्रिया झाल्यावर तो पायावर उभा राहून चालत असल्याचे व्हिडीओ शेअर केला होता. मिळालेल्या महितीनुअर नीता अंबानी स्पोर्ट्स बिझिनेस समिट साठी सोमवारी लंडन येथे गेल्या आहेत. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीतचा प्रवास त्यांनी दाखविला होता. जसप्रीत आयपीएल मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. नीता म्हणाल्या, प्रतिभा कुठूनही येते आणि यशाचे शिखर गाठू शकते. या युवा खेळाडूचा प्रवास असाच झाला असून त्याचा शोध मुंबई इंडीयन्सनी लावला याचा आम्हाला अभिमान आहे.

Leave a Comment