या पठ्ठ्याने वाळवंटात उगवले सोने

combo1
जैसलमेर : आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. असे असताना देखील आपल्याकडे कृषीसंकटांची कमतरता नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ठरलेल्याच आहेत. मात्र जैसलमरच्या एका तरूणाने या संकटांवर मात करून शेती हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारता येऊ शकतो आणि त्यातून समृद्धी प्राप्त करता येते हे पूर्ण देशाला दाखवून दिले आहे.

दिल्लीत भरलेल्या एका कृषीप्रदर्शनाला राजस्थानच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हरीश धनदेवने भेट दिली आणि थेट पूर्णवेळ शेतकरी होण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या १२० एकर जमिनीत कोरफड आणि अन्य पिकांची शेती सुरू केली. या शेतीतून त्याला दीड ते दोन कोटी रूपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. यातून हरीशने आपली स्वतःची कंपनीही सुरू केली आहे. पतंजली फूड प्रोडक्ट्सला या कोरफडचा पुरवठा ज्यूस बनवण्यासाठी केला जातो. हरीशच्या कोरफडीला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगली मागणी आहे.

यापूर्वी जैसलमेर महापालिकेत ज्यूनिअर इंजिनिअर पदावर हरीश काम करत होता. ती नोकरी सोडून शेतकरी बनणाऱ्या हरीशची कहाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठीही नक्कीच प्रेरणादायी ठरेल. कारण डॉक्टरचा मुलगा जसा डॉक्टर बनतो तसा शेतकऱ्याचा मुलगाही शेतकरी बनू शकतो हे हरिशने सिद्ध केले आहे.

Leave a Comment