भेटूया जगातील एकमेव तिळ्या बॉडीबिल्डर भगिनींना


ब्राझील मध्ये बॉडीबिल्डिंग क्षेत्रात तिघी बहिणी चांगल्याच चर्चेत आहेत. मुख्य म्हणजे त्या तिळ्या आहेत, अगदी एकसारख्या दिसतात आणि बरेचवेळा या तिघींमध्येच स्पर्धा होते. त्यांनी जर एकसारखे ड्रेस घातले असतील तर स्पर्धेतील जज कोण कुठली हे बरेच वेळा ओळखू शकत नाहीत असेही सांगितले जाते. अँड्रीयाना, आलेस्संद्रा आणि अँड्रीया अशी त्यांची नावे असून त्या ३७ वर्षाच्या आहेत. ब्राझीलच्या साओ पाउलो शहरात त्या राहतात. यातील अँड्रीया सहा वर्षे इटली मध्ये होती पण आता ती ब्राझीलला परतली आहे.


या भगिनींचे विशेष म्हणजे त्या एकसारखे डाएट घेतात, एकसारखा व्यायाम करतात, इतकेच काय त्याचा कॉस्मेटिक सर्जन सुद्धा एकच आहे. त्या सांगतात, लहानपणापासून आम्ही सर्व गोष्टी एकत्र केल्या आहेत आणि त्यात खूप आनंद मिळविला आहे. त्यामुळे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात एकत्र उतरण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि तो अतिशय योग्य ठरला आहे. त्यामुळे आमचे नाते अधिक घट्ट बनले आहे. आम्ही एकसारखे दिसावे अशीच आमची अपेक्षा आहे. एकमेकींशी सल्लामसलत करूनच आम्ही आमचे निर्णय घेतो. आम्ही एकमेव अश्या तिळ्या बहिणी असू की आमच्यातच स्पर्धा आहे.

एकत्र प्रशिक्षण, एकच डाएट, एकच व्यायाम घेण्यामागचे कारण त्या सांगतात की आम्हा सर्वाना विजयाची समान संधी मिळावी असे वाटते. दिवसाला आठ छोटे छोटे आहार, व्यायाम असे त्याचे रोजचे जीवन आहे. आलेस्संद्राला १३ वर्षाचा मुलगा आहे त्याने मात्र आपण आयुष्यात कधीच बॉडीबिल्डिंग करणार नाही असे जाहीर करून टाकले आहे.

Leave a Comment