फक्त ९० भाग्यवंतांना मिळणार जावा स्पेशल एडीशन बाईक


मोटार सायकल उत्पादक कंपनी जावाने त्यांच्या ९० व्या वर्धापनदिनानिमित्त एक खास बाईक सादर करण्यात येत असल्याची घोषणा केली असून ही अॅनिव्हर्सरी एडीशन फक्त ९० भाग्यवंतांना मिळू शकणार आहे. कारण त्याची फक्त ९० युनिट बनविली जाणार आहेत. जे ग्राहक या बाईक साठी नोंदणी करतील त्याना लकी ड्रॉ काढून नंबर लागल्यास बाईक मिळू शकणार आहे. ज्यांनी अगोदरच जावा साठी बुकिंग केले आहे पण त्यांना डिलीव्हरी मिळालेली नाही तेही या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होऊ शकतील फक्त त्यासाठी त्यांना स्वतः वितरकाकडे नोंदणी करावी लागेल. त्यासाठी शेवटची तारीख २२ ऑक्टोबर आहे.

या स्पेशल एडिशन बाईकला १९२९ मध्ये जावा ज्या प्रकारच्या बाईक बनवीत होती तसाच लुक दिला गेला आहे. हा लुक अतिशय आकर्षक आहे. बाईकला २९३ सीसीचे सिंगल सिलिंडर डीओएचसी इंजिन दिले गेले असून ते बीएसव्हीआय एमिशन स्टँडर्ड बेस्ड आहे. बाईकला सहा स्पीड मॅन्यूअल ट्रांसमिशन दिले गेले आहे. या संदर्भातली माहिती कंपनीच्या वेबसाईटवर दिली गेली आहे. लकी ड्रॉ विजेत्यांची नावे २३ ऑक्टोबरपासून पुढे ९ दिवस घोषित केली जाणार आहेत. त्यांना १५ दिवसात बाईकची डिलीव्हरी दिली जाणार आहे.

१९२९ मध्ये जावा मोटारसायकल कंपनीने प्रीमियम बाईकचे उत्पादन सुरु केले होते. स्पेशल एडीशन बाईक कंपनीच्या पितमपुरा प्रकल्पात बनविल्या गेल्या आहेत.

Leave a Comment