दहा रुपयाची नोट मिळवून देतेय १३५५ रुपये


हेडिंग वाचल्यावर कुणाला हा एखादा लॉटरीचा प्रकार असेल असे वाटण्याची शक्यता आहे. मात्र तसे काहीही नाही. भारतीय चलनात वापरली जात असलेली १० रुपयाची नोट तुम्हाला १३५५ रुपये मिळवून देऊ शकते. त्यासाठी ईबे डॉट कॉम वर जावे लागेल. तेथे १० रुपयाच्या नोटेची विक्री केली जात आहे. त्यासाठी अर्थातच काही अटी आहेत. एक म्हणजे ही नोट नवी हवी. आणि दुसरे म्हणजे तिच्यावर ऊर्जित पटेल यांची सही हवी. ऊर्जित पटेल रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर आहेत. या नोटेची ऑनलाईन विक्री करता येत असून त्याबदली १३५५ रुपये ६२ पैसे मिळणार आहेत.

ईबे वेबसाईटवर यापूर्वी केवळ १० चीच नाही तर १ रुपया आणि १०० रुपयांच्या नोटाही अश्याच महाग विकल्या गेल्या आहेत. ईबे तसेच आणखी काही वेबसाईट वेळोवेळी या तऱ्हेने चलनी नोटांची विक्री करतात. यापूर्वी १ रुपया आणि १०० रुपयाच्या नोटा विक्री केल्या गेल्या तेव्हा सोशल मिडियावर त्यासंदर्भात बरीच चर्चा झाली होती.

Leave a Comment