टोक्यो ऑलिम्पिक गेम्समध्ये प्रथमच बनणार इंडिया हाउस


पुढच्या वर्षी टोक्यो येथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धात प्रथमच भारताचे ऑलिम्पिक हाउस बनणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघ आणि जेएसडब्ल्यू समूहाने त्यासाठी गुरुवारी सहकार्य करार केला आहे. क्रीडामंत्री किरण रीजीजू यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे देश क्रीडास्पर्धेदरम्यान स्वतः साठी असे आतिथ्य गृह बांधतात. भारत असे आतिथ्यगृह प्रथमच उभारणार आहे. यात भारतीय संस्कृती आणि वारसा यांचे दर्शन घडविले जाईल. क्रीडामंत्री किरण रीजीजू, ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बात्रा व महासचिव राजीव मेहता यांच्या उपस्थितीत इंडिया हाउस लोगोचे अनावरण केले गेले.

क्रीडामंत्री किरण रीजीजू म्हणाले, ऑलिम्पिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना योग्य वातावरण दिले गेले पाहिजे. टोक्यो इंडिया हाउस भारताची झलक दाखवेलच पण भारतीय खेळाडूंना घरासारखे वातावरण देईल. त्याच्यासाठी तेथे चिकित्सा सुविधा असेल तसेच भोजनाची व्यवस्था असेल. टोक्यो इंडिया हाउस २२०० चौरस मीटर जागेत उभारले जाणार असून पुढच्या जुलाई मध्ये हे काम केले जाणार आहे.

Leave a Comment