ऑस्ट्रेलियात भारतीय शेतकरी कोट्याधीश

farmer
नवी दिल्ली: पंजाब मधील आपले छोटेसे भूखंड विकून ऑस्ट्रेलियात शेती करणारे अनेक शेतकरी आता लॅंडलॉर्ड बनले आहेत. त्यांच्या शेतात ट्रॅक्टर नव्हे; तर सॅटेलाईट संचलित मशीन काम करतात. शेतात किटकनाशकांची फवारणी विमानाने केली जाते.

अशा प्रकारे जमीन घेऊन शेती करणाऱ्यांना ऑस्ट्रेलियात मुक्तद्वार आहे. कारण ऑस्ट्रेलियात ८० टक्के शेतीयोग्य जमीन वापरावाचून पडून आहे. ही जमीन कसण्यासाठी त्या देशात मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे ही जमीन लागवडीखाली आणण्यासाठी सरकार स्वत:च प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सरकार यासाठी स्वत: विदेशी शेतक-यांना शेतीसाठी जमिनी देत आहे.

ही परिस्थिती माहिती असलेल्या पंजाबच्या शेतक-यांनी ७ वर्षांपूर्वी पंजाब आणि हरियाणातील साधारण १४ हजार शेतक-यांनी ऑस्ट्रेलियात शेतजमीन खरेदी केली आहे.

1 thought on “ऑस्ट्रेलियात भारतीय शेतकरी कोट्याधीश”

Leave a Comment