आनंद महिंद्रांनी शेअर केलेला हा फोटो तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. व्हाट्स अप वंडर बॉक्स अशा नावाने ते ट्विटर अनेक हटके व प्रेरणादायी असे फोटो शेअर करत असतात. नुकताच आनंद महिंद्रांनी लहान मुलांचा कॅरम खेळतानाचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये काही लहान मुले कॅरेम खेळत आहेत. मात्र ही लहान मुले पारंपारिक कॅरेम बोर्डावर न खेळताना मातीमध्ये कॅरेमसारख्या आकाराचा चौकनी बॉक्स त्यांनी खेळण्यासाठी तयार केला आहे. चारही बाजूला त्यांनी खड्डे देखील पाडले आहेत. विशेष म्हणजे कॅरमच्या सोंगट्या आणि स्ट्रायकर्स म्हणून या मुलांनी बाटल्याच्या झाकणांचा वापर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी फोटो शेअर करत लिहिले की, सकाळी सकाळी व्हॉट्सअपला हा प्रेरणादायी फोटो आला. भारताकडे कल्पनाशक्तीची कमी नाही.

महिंद्रा यांनी शेअर केलेला हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. आतापर्यंत या फोटोला 17 हजार पेक्षा अधिक लाईक्स आले असून, शेकडो कमेंट्स देखील आल्या आहेत.

अनेक युजर्सनी हा फोटो नक्कीच प्रेरणादायी व कल्पनाशक्तीला सलाम करण्यासारखा आहे असे म्हटले.

 

Leave a Comment