क्रेडिट-डेबिट कार्ड हॅक झाल्यास त्वरित हे काम करा

आज अनेकजण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतात. कार्ड जवळ असल्याने वेळेची देखील बचत होते व रोख रक्कम जवळ बाळगण्याची देखील गरज राहत नाही. मात्र याचबरोबर फसवणूकीला देखील सामोरे जावे लागत असते. अनेकदा अकाउंटची माहिती लीक होते व बँक खाते रिकामे होते. हँकर्स अनेकदा तुमचे कार्ड हँक करतात. तसेच अनेकदा कार्ड हरवते व चोरीला देखील जात असते. त्यामुळे जर कार्ड हरवले, चोरीला गेले अथवा हॅक झाले तर काय करायचे याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

(Source)

बँकेला त्वरित माहिती द्या –

जर तुमचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हॅक झाले असेल व तुमच्या खात्यातून हॅकर्स पैस काढत असेल तर त्वरित याबाबतची माहिती तुमच्या बँकेच्या जवळच्या शाखेत द्या. तुम्ही कस्टमर केअरला फोन करून देखील ही माहिती देऊ शकता. तुम्ही जेवढ्या लवकर बँकेला माहिती द्याला, तेवढ्या लवकर बँक पाऊले उचलेल व तुमचे कार्ड बंद करेल.

(Source)

ई-मेल करा –

कस्टमर केअरद्वारे कार्ड ब्लॉक करण्यासाठी बँकेला ई-मेलद्वारे फसवणुकीची माहिती द्या. ई-मेलमध्ये तुम्ही पुरावा म्हणून स्क्रीनशॉट, स्टेटमेंट पाठवू शकता.

(Source)

कार्डला त्वरित ब्लॉक करा –

तुमच्या क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती चोरीला गेली आहे, याची माहिती मिळताच सर्वात प्रथम तुमचे कार्ड ब्लॉक करा. यासाठी तुम्ही कस्टमर केअरला कॉल करू शकता.

(Source)

नुकसान भरपाईसाठी अर्ज करा –

जर तुमची फसवणूक झाली असेल व तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतले गेले असेल तर तुम्ही बँकेला नुकसान भरपाईसाठी अर्ज करू शकता. भरपाईसाठी अर्ज हा तीन दिवसाच्या आत करा, अन्यथा पुर्ण प्रक्रियेसाठी 120 दिवस लागू शकतात.

 

 

Leave a Comment