दुसऱ्या सेलमध्ये तब्बल 30 मिनिटात आऊट ऑफ स्टॉक झाला Galaxy Fold


स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने नुकताच आपला बहुप्रतिक्षित सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड लॉन्च केला. फोल्डेबल स्मार्टफोनसुद्धा लोकांना आवडला आहे. गॅलेक्सी फोल्डच्या प्री-बुकिंग विक्रीदरम्यान, सर्व युनिट 30 मिनिटांच्या आत विकले गेले आहेत. यापूर्वी, या फोनची प्री बुकिंग कंपनीने केली होती, ज्यामध्ये 30 मिनिटांत सुमारे 1,600 मोबाईल विकले गेले आहेत. पण आता गॅलेक्सी फोल्डची प्री बुकिंग ऑफलाइन व ऑनलाइन स्टोअरवर बंद झाली आहे. त्याचबरोबर हा फोन 20 ऑक्टोबरपासून ग्राहकांना देण्यात येणार आहे.

कंपनीने या फोनची किंमत 1,64,999 रुपये ठेवली आहे. 4 ऑक्टोबरपासून ग्राहक या फोनची प्री-बुकिंग करू शकतील. त्याचबरोबर, गॅलेक्सी फोल्डची डिलिव्हरी 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

हा फोन काळ्या रंगामध्ये मिळेल. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. एक  16 मेगापिक्सल, दुसरा 12 मेगापिक्सल आणि तिसरा देखील 12 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी यात ड्युल कॅमेरा देण्यात आला आहे. एक 8 मेगापिक्सल आणि दुसरा 10 मेगापिक्सल आहे.

(Source)

गॅलेक्सी फोल्डची प्री बुकिंग 4 ऑक्टोंबरपासून सुरू होईल आणि विक्री 20 ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे.  सॅमसंग ई-शॉप आणि कंपनीच्या रिटेल स्टोर्समध्ये प्री बुकिंग करता येईल.

यामध्ये असलेल्या दोन स्क्रीन व्यतरिक्त हा फोन सर्वसामान्य फोन प्रमाणेच आहे. डिस्प्लेमध्ये एमोलेड पॅनेल वापरण्यात आला आहे. फ्रंट डिस्प्ले खूपच छोटा असून, तो 4.6 इंच आहे. तसेच फुल एचडी देखील नाही.

(Source)

दुसरा डिस्प्ले 7.2 इंच असून, यात Infinity Flex Dynamic AMOLED पॅनलचा वापर करण्यात आला आहे. ज्याचे रिज्योलुशन QXGA+ आहे. हा स्मार्टफोन Android 9 Pie बेस्ड One UI वर चालतो. या स्मार्टफोनममध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

(Source)

स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी युएसबी टाइप सी आहे. यामध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेली 4,380 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment