सुर्यवंशीच्या भेटीला ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’


सध्या सोशल मीडियावर रोहित शेट्टीचा आगामी ‘सुर्यवंशी’ चित्रपटातील एक फोटो व्हायरल झाला आहे. रोहितच्या ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ या धडाकेबाज चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफानी कमाई केली होती. आता बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार, रणवीर आणि अजय देवगण हे तिघेही पोलिसांच्या भूमिकेत पुन्हा एकदा विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहेत.


तीन सुपरस्टार अक्षयने शेअर केलेल्या फोटोत एकत्र दिसत आहेत. खाकी वर्दीत रणवीर सिंह आणि अजय देवगण दिसत असून त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला अक्षय दिसत असून त्याच्याही अंगावर खाकी वर्दी आहे. अक्षयच्या मागे पोलिसांची फौज मोहिमेसाठी रवाना होत असल्याचे दिसत आहे.

अक्षयने या फोटोला कॅप्शन देत पोलिसांच्या वर्दीतील देसी अॅवेंजर्स. जेव्हा ‘सिंघम’ला भेटतो ‘सिम्बा’ आणि दोघांनाही मिळतो ‘सुर्यवंशी’ तेव्हा केवळ आतषबाजीची अपेक्षा नाही तर २७ मार्चला ब्लास्ट होणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment