पाच बंडखोरांची शिवसेनने पक्षातून केली हकालपट्टी


मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठीच्या तिकीट वाटपादरम्यान नाराज झालेल्या इच्छुकांनी बंड पुकारले होते. दरम्यान पाच बंडखोरांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे. पण अद्याप कोणताही निर्णय तृप्ती सावंत, राजु पटेल आणि सुरेश भालेराव या तिघा बंडखोरांबाबत घेतलेला नाही.

तत्पूर्वी बंडखोरांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर शिवसेनेनेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई सुरु केली आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील महेश चिवटे आणि सोलापूरमधील प्रवीण कटारिया आणि जिल्हाप्रमुख महेश कोठे तर माढ्यातील एका बंडखोराला पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे वांद्रे (पूर्व) मतदारसंघातील आमदार तृप्ती सावंत, वर्सोवातील नगरसेविका राजुल पटेल आणि घाटकोपर पश्चिममधील सुरेश भालेराव या बंडखोरांबाबत मात्र कारवाई करण्याबाबत शिवसेनेने ‘आस्ते कदम’ची भूमिका घेतली आहे.

Leave a Comment