टीका करणाऱ्या इस्लामिक धर्मगुरूंना नुसरत जहाँचे उत्तर


तृणमुलच्या नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ या पती निखिल जैनसोबत कोलकात्यातील चालताबागान दुर्गा पूजा मंडपात बंगाली हिंदू परंपरेचा भाग असलेल्या ‘सिंदूर खेला’ मध्ये सहभागी झाल्या होत्या. उलेमा-ई-हिंदचे उपाध्यक्ष मुफ्ती असद कासमी यांनी दुर्गा पूजा उत्सावात गेल्याबद्दल नुसरत जहाँ यांच्यावर टीका केली होती. मुफ्ती असद कासमी यांनी नुसरत जहाँ यांनी आपले नाव आणि धर्म बदलून घ्यावा. त्या इस्लाम आणि मुस्लिमांची बदनामी करत असल्याचे म्हटले होते.

माझ्यावर देवाची विशेष कृपा असून मला वादांमुळे फरक पडत नसल्याचे नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लीम धर्मगुरूंनी कोलकात्यात दुर्गा पूजा उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांना लक्ष्य केले होते. माझ्यावर देवाची विशेष कृपा आहे. सर्व सण मी साजरे करते. मानवतेचा मी आदर करते. माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी असून मला वादांमुळे काहीही फरक पडत नसल्याचे नुसरत जहाँ म्हणाल्या.

नुसरत जहाँनी पूजा करणे अजिबात नवीन नाही. फक्त इस्लामच्या अनुयायांना अल्लाची पूजा करण्याचे आदेश असतानाही नुसरत जहाँ हिंदू देवतांची पूजा करतात. जे त्यांनी केले ते पाप असल्याचे धर्मगुरु म्हणाले होते. धर्माबाहेर त्यांनी लग्न केल्यामुळे त्यांनी त्यांचे नाव आणि धर्म बदलावा असे मुफ्ती असद कासमी म्हणाले.

नुसरत जहाँ इस्लामविरोधी काम करत असल्याची टीका देवबंदमधल्या उलेमांनी केली होती. नुसरत जहाँ यांना जर इस्लामच्या शिकवणीविरुद्ध जाणारी कामे करायची असतील तर त्यांनी प्रथम आपले नाव बदलले पाहिजे. अशा प्रकारे वागून त्या इस्लाम धर्माचा अपमान का करत असल्याचा प्रश्न उलेमांनी विचारला होता. यापूर्वीही नुसरत यांनी पूजा केली आहे. अशाप्रकारच्या कृत्याला इस्लाम धर्मात बिलकूल परवानगी नसल्याचे उलेमांचे म्हणणे होते.

Leave a Comment