नोकियाचे हे दोन स्मार्टफोन्स झाले स्वस्त, जाणून घ्या किंमत

एचएमडी ग्लोबलने भारतातील आपल्या नोकिया 2.2 आणि नोकिया 3.2 या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. या दोन्ही फोनच्या किंमती क्रमशः 6,599 रूपये आणि 7,499 रूपये झाल्या आहेत. नोकिया 2.2 या वर्षीच जूनमध्ये आणि नोकिया 3.2 मे महिन्यात भारतात लाँच झाला होता.

नवी किंमत –

किंमती कमी केल्यानंतर नोकिया 2.2 च्या 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 6,599 रूपये झाली आहे. तर 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 7,599 रूपये आहे. तर नोकिया 3.2 च्या 2  जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत आता 7,499 रूपये  आणि 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 8,499 रूपये आहे. हे फोन नोकियाची वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

(Source)

नोकिया 2.2 चे स्पेसिफिकेशन –

हा फोन ड्युअल सिम सपोर्टसोबत अँड्रॉयड पाय 9.0 सोबत येईल.याबरोबर फोनमध्ये 5.71 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले असेल. डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच मिळेल. यामध्ये मीडियाटेकचा क्वॉडकोर हीलियो ए22 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 3000 एमएएचची बॅटरी मिळेल. कनेक्टिविटीसाठी नोकिया 2.2 मध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देण्यात आले आहे.

(Source)

नोकिया 3.2 चे स्पेसिफिकेशन –

फोनमध्ये 6.26 इंचचा एचडी प्लस डिस्प्ले असून फोनमध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टाकोर स्नॅपड्रँगन 429 प्रोसेसर मिळेल. यात 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.  याचबरोबर फोनमध्ये 4G VoLTE,वाय-फाय, ब्लूटूथ v4.2, जीपीएस, एफएम रेडियो, 3.5एमएमचा हेडफोन जॅक, फिंगरप्रिंट सेंसर आणि 4000एमएएच ची बॅटरी मिळेल.

Leave a Comment