शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अ‍ॅबी अहमद अली यांना जाहीर


मुंबई – शांततेचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अ‍ॅबी अहमद अली यांना जाहीर करण्यात आला आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारांचे हे १०० वे वर्षं असून याची घोषणा ओस्लोमध्ये करण्यात आली. अ‍ॅबी यांनी इथिओपियाचा एरिट्रियाबरोबर प्रदिर्घ काळापासून सुरू असलेला सीमावाद सोडवण्याकरता दिलेल्या योगदानासाठी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.


फार लवकरच अ‍ॅबी अहमद यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असे मत अनेक लोकांचे असेल पण त्यांनी घेतलेली मेहनत ही जगाला समजली पाहिजे आणि अशा कामासाठी प्रेरणा देणे आवश्यक असल्याचे अध्यक्षा ब्रिट अँडरसन म्हणाल्या. २०१८ मध्ये २३ वर्षांच्या अ‍ॅबी अहमद यांनी देशाची सुत्रे हाती घेतली. इथिओपियाची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी विरोधकांची – कार्यकर्त्यांची तुरुंगातून मुक्तता केली. एरिट्रियासोबत सुरु असलेला सीमायुद्धाचा तिढा त्यांनी सोडवला. एरिट्रियासोबत झालेल्या शांतताकरारामुळे २० वर्षांपासून सुरु असलेला वाद त्यांनी क्षमवला, यासाठी त्यांना शांततेचा नोबल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Comment