हवा आणि अंतराळ एकमेंकाना कोठे भेटतात ? शोध घेण्यासाठी नासाने लाँच केला उपग्रह

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने गुरूवारी एक उपग्रह लाँच केला आहे. या उपग्रहाच्या मदतीने हवा आणि अंतराळ एकमेंकांना कोठे भेटतात याचा शोध घेतला जाणार आहे. या उपग्रहाचे नाव आयकॉस्फेरिक कनेक्शन एक्सप्लोरर आहे. हा उपग्रह दोन वर्षांसाठी अंतराळात लाँच करण्यात आला आहे.

हा उपग्रह फ्लोरिडाच्या तटापासून लांब अटलांटिक महासागरावरून उड्डाण घेणाऱ्या एका विमानातून सोडण्यात आला.  विमानातून सोडण्यात आल्यानंतर उपग्रहात लावण्यात आलेल्या रॉकेटने त्याला योग्य दिशेने नेले.

हा उपग्रह वायूमंडळातील सर्वात वरचा थर आयनोस्फीअरमध्ये काम करेल. पृथ्वीच्या जवळपास 80 किलोमीटरवरील सर्व वायूमंडळ हे आयनोस्फीअर म्हणून ओळखले जाते. आयनोस्फीअरमध्ये हवेचा दबाव हा अगदी नगण्य असतो. वायुमंडळातील हवेच्या मात्रेच्या प्रमाणाच्या 200 व्या भागापेक्षा ही हवेचे प्रमाण कमी असते.

आयनोस्फीअरचे महत्त्व रेडिओ तरंगाच्या प्रसरणासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. शॉर्ट वेव्स आयनोस्फीअरच्या माध्यमातूनच हजारो किलोमीटर लांब पाठवले जाते.

Leave a Comment