जिओने बदलले आपले प्लॅन, जाणून काय आहेत ते

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना इंटरकनेक्ट युजेज चार्ज (आययुसी) घेण्याची घोषणा केल्यानंतर आता आपल्या प्री-पेड प्लॅन्समध्ये देखील बदल केले आहेत. जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि रिचार्ज करायचे असेल तर तुमच्यासाठी हे प्लॅन जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

जिओने आपल्या प्लॅनमध्ये आययुसी चार्ज जोडले आहेत. आता जिओचे सर्व रिचार्ज करताना आययुसी टॉपअप देखील द्यावे लागेल. याची किंमत तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठरवू शकता. टॉपअपच्या किंमतीत तुम्हाला फ्री डाटा देखील मिळेल.

उदाहरणासाठी की, 399 रूपयांच्या प्लॅनची सुरूवात आता 409 रूपयांपासून होईल. ज्यात 309 रूपये प्लॅनची किंमत आहे व 10 रूपये आययुसी चार्जेस आहेत. 409 रूपयांचा प्लॅनचा कालावधी हा 84 दिवसांचा असून, यात तुम्हाला दररोज 1.5 जीबी डाटा मिळेल आणि जिओ ते जिओ फ्री कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कशी बोलण्यासाठी 124 मिनिटे मिळतील. तसेच, 10 रूपयांच्या बदल्यात तुम्हाला 1 जीबी डाटा देखील तुम्हाला मिळेल.

तुमच्या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही गरजेप्रमाणे आययुसी टॉपअप करू शकता. आययुसी टॉपअपची किंमत 10,20,50, 100, 500 आणि 1000 रूपये आहे. 10 रूपयांच्या प्लॅनमध्ये 124 मिनट, 20 रूपयांच्या प्लॅनमध्ये 249 मिनटे, 50 मध्ये 656 मिनटे, 100 रूपयांच्या प्लॅनमध्ये 1,362 मिनटे, 500 रूपयांच्या प्लॅनमध्ये 7,012 आणि 1,000 रुपयांमध्ये 14,074 मिनटे मिळतील. याद्वारे तुम्ही दुसऱ्या नेटवर्कशी बोलू शकाल.

(Source)

समजा तुम्ही 399 रूपयांचा प्लॅन घेतला. मात्र तुम्ही दुसऱ्या नेटवर्कवर जास्त संवाद साधता तर तुम्ही 1000 रूपयांचा प्लॅन घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 1,399 रूपये द्यावे लागतील. या प्लॅनच्या रिचार्जनंतर तुम्ही 14,074 मिनिटे दुसऱ्या नेटवर्कवर बोलू शकता.

जर तुम्ही याआधीच रिचार्ज केले असेल तर तुम्हाला तुमच्या प्लॅनचा कालावधी पुर्ण होईपर्यंत आययुसी चार्जेस द्यावे लागणार नाही. रिचार्ज संपल्यानंतर तुम्हाला आययुसी चार्जेस टॉपअप घ्यावे लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही जिओ अॅप आणि वेबसाईटला भेट देऊ शकता.

Leave a Comment