कोहलीचे शानदार शतक, गॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची केली बरोबरी

पुण्यात सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार शतकी खेळी केली आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे 26 वे शतक आहे. विराटने 173 चेंडूमध्ये आपले शतक पुर्ण केले.

सर्वाधिक कसोटी शकते ठोकणारा चौथा भारतीय –

या शतकाबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये 26 शतके झळकवणारा विराट हा 21 वा खेळाडू ठरला आहे तर अशी कामगिरी करणारा चौथा  भारतीय खेळाडू आहे.

सर्वाधिक झळकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडूलकर (51), राहूल द्रविड (36) आणि सुनिल गावस्कर (34) यांच्यानंतर विराट चौथा भारतीय आहे.

गॅरी सोबर्स आणि स्टिव्ह स्मिथची बरोबरी –

या शतकाबरोबरच विराटने वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू गॅरी सोबर्स आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर 26 शतके आहेत. याचबरोबर विराटने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक (25) ला मागे टाकले.

कमी डावात 26 शतके झळकवणारा चौथा खेळाडू –

सर्वात कमी डावात 26 शतक झळकवणाऱ्यांच्या यादीत विराट चौथ्या स्थानी आहे. विराटच्या आधी डॉन ब्रॅडमन यांनी 69 डावांमध्ये 26 शतके झळकावली आहेत. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ (121), सचिन तेंडूलकर (136) यांचा क्रमांक आहे. विराटने 138 डावांमध्ये 26 शतके झळकवण्याचा रेकॉर्ड केला आहे.

रिकी पाँटिंगशी बरोबरी –

कर्णधार म्हणून विराटचे हे 19 वे शतक आहे. या शतकाबरोबरच विराटने ऑस्ट्रेलिया माजी कर्णधार  रिकी पाँटिगच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. रिकी पाँटिंगच्या नावावर कर्णधार असताना 19 शतके ठोकली आहेत. तर कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके लगावण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ (26) च्या नावावर आहे.

 

Leave a Comment