जगातील पहिला पॉप अप कॅमेरा स्मार्ट टिव्ही भारतात होणार लाँच

भारतीय स्मार्टफोन बाजारात पॉप सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या मागणीत वाढ झाली आहे. याचबरोबर बाजारात स्मार्ट टिव्हीच्या मागणीत देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आता चीनी स्मार्टफोन कंपनी हॉनर जगातील पहिला पॉपअप कॅमेरा असणारा स्मार्ट टिव्ही लाँच करण्याच्या तयार आहे. कंपनी 14 ऑक्टोंबरला पॉपअप कॅमेरा असणारा हॉनर व्हिजन आणि व्हिजन प्रो स्मार्ट टिव्ही बाजारात आणणार आहे.

कंपनी दोन व्हेरिएंटमध्ये हे स्मार्ट टिव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने ऑगस्टमध्येच व्हिजन स्मार्ट टिव्ही चीनी बाजारात लाँच केला होता. कंपनीने या टिव्हींच्या किंमती आणि फीचर्सविषयी अद्याप काहीही माहिती दिलेली नाही.

(Source)

हॉनर व्हिजन स्मार्ट टिव्हीचे संभाव्यता स्पेसिफिकेशन –

फीचर्सबद्दल सांगायचे तर प्रो व्हेरिएंटमध्ये पॉप अप कॅमेरा आणि दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 6 फार-फिल्ड मायक्रोफोन, ऑनबोर्ड स्टोरेजसोबत 10 वॉटचे एक्स्ट्रा स्पीकर्स दिले जातील. दोन्हीमध्ये 55 इंचचा 4के डिस्प्ले असेल.

या टिव्हीच्या स्क्रीनचा 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 400 निट्स ब्राइटनेस आणि 16:9 आस्पेक्ट रेशिओ असेल. शानदार साउंड क्वालिटीसाठी यामध्ये HarmonyOS सपोर्ट देण्यात येईल. यामध्ये दोन जीबी रॅम देण्यात येईल. याशिवाय कनेक्टिविटीसाठी ग्राहकांना या स्मार्ट टिव्हीत एचडीएमआय पोर्ट्स आणि एक यूएसबी 3.0 पोर्ट देखील मिळेल.

Leave a Comment