पुन्हा जुन्या अंदाजात परतला हिमेश रेशमिया


काही वर्षांपूर्वीच अभिनयातही बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाने पदार्पण केले. सध्या त्याचा आगामी ‘हॅप्पी, हार्डी अँड हिर’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला. तसेच सोशल मीडियावर या चित्रपटातील गाणीही हिट ठरली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आता हिमेश त्याच्या जुन्याच स्टाईलमध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

आपल्या गाण्यांसोबतच स्टाईलसाठीही हिमेश रेशमिया ओळखला जातो. डोक्यात टोपी घातलेला त्याचा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. सुरुवातीच्या काळात त्याने त्याची हिच स्टाईल जपली होती. तो आता पुन्हा एकदा त्याच स्टाईलमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे.


त्याचा हा लूक त्याने गायलेले सुपरहिट गाणे ‘आशिकी मे तेरी’ या गाण्याचं रिक्रेयेटेड व्हर्जन आणि ‘तेरी मेरी कहानी’च्या रिमिक्स व्हर्जन गाण्यात पाहायला मिळणार आहे. तो ‘हॅप्पी, हार्डी अँड हिर’ या चित्रपटात दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १२ शहरांचा दौरा करणार आहे. तसेच तो म्यूझिक कॉन्सर्टचेही आयोजन करणार आहे.

Leave a Comment