‘मोतीचूर चकनाचूर’च्या ट्रेलरला न्यायालयाची स्थगिती


‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. १० ऑक्टोबरला नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार होता.

‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटाचे लेखक देव मित्र बिस्वाल यांचे मानधन दिले नसल्यामुळे त्यांनी निर्माता उडपेकर मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने यावर ट्रेलरला स्थगिती देण्याच निर्णय दिला आहे. निर्मात्याने बिस्वाल यांना ११ लाख रुपये मानधन देण्याचे ठरले होते. पण त्यांना केवळ ६ लाख रुपयेच मिळाले. या स्क्रिप्टवर गेली पाच वर्षे बिस्वास काम करीत होते. निर्मात्यांना कथानक आवडले व तिन चित्रपटांसाठी करारबध्द केले. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा यातील पहिलाच चित्रपट होता. पण कंपनीचे संचालक राजेश भाटिया आणि बिस्वाल यांच्यात एडिंटिंगच्या दरम्यान मतभेद झाले होते.

बिस्वाल यांना कंपनीच्यावतीने एक ईमेल पाठवण्यात आला. त्यांची सेवा संपली असल्याचे यात लिहिण्यात आले होते. त्यानंतर बिस्वाल यांनी निर्मात्याशी संपर्क केला. परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायलयाचे दार ठोठावले होते. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

Leave a Comment