राजनाथ सिंह यांच्या शस्त्र पुजनाचे पाक सैन्याने केले समर्थन

विजयादशमीच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः फ्रान्समध्ये जात राफेल विमान घेतले. यावेळी राजनाथ सिंह यांनी पारंपारिक पध्दतीने शस्त्र पुजा केली आणि राफेल विमानावर ‘ऊं’ देखील काढले. याशिवाय राफेल विमानाच्या खाली लिंबू देखील ठेवण्यात आले. राजनाथ सिंह यांनी केलेल्या पूजेवर भारतात अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काहींनी हे सर्व नाटक असल्याचे देखील म्हटले. मात्र आता या मुद्यावर पाकिस्तानने राजनाथ सिंह यांची साथ दिली आहे.

पाकिस्तानचे सेना प्रवक्ते आसिफ गफूर यांनी यावर म्हटले की, राफेल पूजा करण्यात काहीही चूकीचे नाही. कारण हे धर्मानुसार करण्यात आलेले आहे.

आसिफ गफूर यांनी ट्विट केले की, राफेल पूजेत काहीही चुकीचे नाही. कारण हे धर्मानुसार केलेले आहे. कृपया, लक्षात घ्या की, हे एकमेव मशीन नाही जी महत्त्वाची आहे. त्या मशीनला सांभाळणाऱ्या व्यक्तीची क्षमता, जिद्द आणि संकल्प महत्त्वाचे आहे. आम्हाला आमच्या पीएएफ शहीदांवर गर्व आहे.

दोन्ही देशांमध्ये कलम 370 वरून तणावाचे वातावरण असताना आसिफ गफूर यांनी हे ट्विट केले आहे.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खडगे आणि संदीप दीक्षित यांनी राजनाथ सिंह यांनी केलेल्या पुजेवर टीका केली होती. हा सर्व ड्रामा करण्याची काहीही गरज नव्हती असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment