मोदींचे नवे विमान मिसाईल डिफेन्स सिस्टीमसह येणार


देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी नव्याने खरेदी केली गेलेल्या बोईंग बी ७७७ विमानात मिसाईल डिफेन्स सिस्टीम बसविली जात असून ही विमाने भारतीय वायूसेनेतील पायलट उडविणार आहेत. आत्तापर्यंत एअर इंडिया वन नावाने वापरात असलेली आणि देशाच्या सर्वोच्च स्थानावर काम करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरली जात असलेली बोईंग ७४७ विमाने एअर इंडियाचे पायलट उडवीत असत. ही नवी विमाने जुलै २०२० पासून वापरत येणार आहेत. विमानाचे पायलट वायूसेनेचे असले तरी क्रू मेंबर एअर इंडियाचे असतील.

पंतप्रधान मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वैन्कैया नायडू याच्यासाठी ही नवी विमाने वापरली जातील. अमेरिकन प्रकल्पात तयार झालेल्या या विमानात सेल्फ प्रोटेक्शन सुटस व लार्ज एअरक्राफ्ट इंफ्रारेड काउंटर मेजर्स बसविले जाणार आहेत. टॉप ब्रांडच्या नेत्यांसाठी या प्रकारची सुविधा प्रथमच दिली जात आहे. ही विमाने उडविण्याचे प्रशिक्षण वायू दलातील काही पायलटना मुंबईच्या कलिना येथे दिले जात आहे. वायूदलाचे पायलट कुशल असतात मात्र त्यांना प्रवासी विमाने उडविण्याचा अनुभव नसतो त्यामुळे हे प्रशिक्षण दिले जात असल्याचे समजते.

सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती ज्या बोईंग ७४७ चा वापर करत आहेत ती विमाने या नेत्याचा दौरा नसेल तेव्हा व्यावसायिक उड्डाणासाठी वापरली जातात. नवी विमाने फक्त व्हीव्हीआयपी नेत्यांसाठीच राखीव ठेवली जाणार आहेत.

Leave a Comment