काही मिनिटात सोल्ड आउट झाले नायकेचे जीझस शूज


प्रसिद्ध फॅशन ब्रांड नायकीचे स्पेशल एडीशन शूज हातोहात संपले असून बाजारात हे शूज येताच काही मिनिटात ते सोल्ड आउट झाले आहेत. या शूजची किंमत ३ हजार डॉलर्स म्हणजे २ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. या शूजचे नामकरण जीझस शूज असे केले गेले आहे. या शूजच्या नावामागाची कथा अशी की प्रथमच या शूज मध्ये होली वॉटर म्हणजे पवित्र जल भरले गेले आहे. हे शूज ब्रुकलीन बेस्ड क्रिएटीव्ह लेबल MSCHF ने तयार केले आहेत.

यांची खासियत म्हणजे या बुटाच्या सोलमध्ये पवित्र जॉर्डन नदीचे पाणी भरलेले बाहेरूनसुद्धा दिसते असते. बायबलच्या मॅथ्यु १४.२५ प्रमाणे इसा देवदूत जॉर्डन नदीच्या पाण्यावरून चालत असत असा उल्लेख येतो. या बुटाच्या वरच्या भागात रक्ताच्या ठिपक्याप्रमाणे एक लाल ठिपका दिला गेला असून तो जीझसच्या रक्ताचे प्रतिक आहे. लेसचा धाग्यावर क्रॉस लटकविला असून बुटाच्या आतील भाग लाल रंगाचा आहे. हा पोपच्या पारंपारिक शूजचा रंग आहे.


या शूजचे कव्हर सुद्धा खास आहे. त्यात एक देवदूत आणि सीलबंद मोहोर असून ती पोपच्या अधिकृत पॅपल सीलशी मिळतीजुळती आहे. न्युयॉर्क पोस्टला कंपनीचे प्रमुख डॅनीयल ग्रीनबर्ग याने दिलेल्या माहितीनुसार या प्रकारचे काही डझन शूज तयार केले गेले होते कारण ती लिमिटेड एडिशन होती. भविष्यात त्याची सेकंड एडीशन येऊ शकेल.

Leave a Comment