१० कोटींचा मालक बनूनही करणार मजुरी !

carl-crook
लंडन : २५ वर्षांचा एक मजूर ब्रिटनमध्ये कोट्यधीश बनला असून रस्त्यावर मजुरी करणा-या या तरुणाला पाच पौंड म्हणजेच ५०० रुपयांच्या लॉटरी तिकिटावर दहा लाख पौंड म्हणजे दहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. श्रीमंत बनला असला तरी आपले हे मेहनत-मजदुरीचे काम आपण पुढेही चालूच ठेवू असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे बक्षीस जाहीर झाल्यावर दुस‍-याच दिवशी तो पुन्हा कामावर हजर झाला!

मँचेस्टरमध्ये राहणा-या या कष्टाळू तरुणाचे नाव कार्ल क्रुक असे असून आपल्याला जॅकपॉट लागला आहे हे कळताच तो अत्यानंदाने रडू लागला होता. हे पैसे आपण उधळपट्टीने खर्च करून टाकणार नाही. त्याचा योग्य विनियोग करू आणि आपले कामही सुरूच ठेवू, असे त्याने म्हटले आहे. आपली बारा तासांची शिफ्ट तो तशीच सुरू ठेवणार आहे. मला माझे काम आवडते व ते मी करीतच राहणार. मात्र, यापुढे मी ओव्हरटाईम करणार नाही. पुढच्या आठवड्यातील पाच दिवसांची रजा मी घेऊन ठेवली आहे. त्या मुदतीत मी पुढच्या योजना आखणार आहे, असे त्याने सांगितले. या पैशातून त्याला ऑडी आरएस ७ आणि एक नवे घर खरेदी करण्याची इच्छा आहे. शिवाय आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करून आफ्रिकेच्या सफरीवर जाण्याचेही त्याचे स्वप्न आहे !

Leave a Comment