या महिलेला सापडला ओसामाच्या चेहऱ्याचा शिंपला


लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय ठरवा असे कितीही वाटत असले तरी तशी शक्यता कमीच असते. त्यातून लग्नाला ४२ वर्षे लोटली असतील तर प्रश्नच मिटला. पण या बाबत इंग्लंडची रहिवासी ६० वर्षीय डेबर ऑलिव्हर आणि तिचा पती मार्टीन यांना मात्र एक अजब वस्तू मिळाली आणि त्याच्या लग्नाचा ४२ वा वाढदिवस खरोखरी संस्मरणीय ठरला. हे जोडपे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इस्ट सक्सेस मधील विम्चेलसिया बीचवर गेले होते. समुद्र किनाऱ्यावर बरेच लोक होते. किनाऱ्यावर लाखोंनी शंख शिंपले, चमकदार दगड पडले होते. इतक्यात डेबरची नजर एका वेगळ्या शिंपल्यावर पडली आणि कुतूहलाने तिने तो उचलला..


सुरवातीला या शिंपल्याचा आकार तिला येशू प्रमाणे वाटला पण जरा अधिक निरखून पाहिल्यावर शिंपल्याच्या डोक्यावर पागोटे असावे तसा आकार दिसला आणि त्यात हुबेहुब ओसामा बिन लादेनचा चेहरा तिला दिसला. प्रथम त्या दोघांनाही खूप हसू आले पण ओसामाचे दफन समुद्रातच केले गेले होते आणि हा शिंपला समुद्रातूनच मिळाला याचे त्यांना खुपच आश्चर्य वाटले. वाढदिवसाची खास आठवण म्हणून या जोडप्याने हा शिंपला जपून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला चढवून ते जमीनदोस्त करण्याचा मास्टरप्लान ज्याने बनविला तो अल कायदाचा जहाल अतिरेकी आणि प्रमुख ओसामा बिन लादेन याला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा याच्या कारकीर्दीत पाकिस्तानच्या अबोटाबाद मध्ये घुसून अमेरिकन सील कमांडोनी ढेर केले होते आणि त्याचा मृतदेह विमानवाहू नौकेतून नेऊन समुद्रात दफन केला गेला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ल्यात ३००० लोक प्राणास मुकले होते आणि ओसमावर अमेरिकेने २५ लाख डॉलर्सचे बक्षीस लावले होते.

Leave a Comment