मध : किती गुणकारी, किती हानीकारक

honry
मधाचे महत्त्व आपल्याला सांगण्याची गरज नाही. कारण आपण परंपरेने कितीतरी शतकांपासून पदार्थाला गोडी आणणारे साधन म्हणून मधाचा वापर करत आलेलो आहे. सोळाव्या शतकात गुळाचा आणि साखरेचा शोध लागला. त्यापूर्वी मधाचाच वापर केला जात होता. केवळ खाद्य पदार्थाला गोडी आणण्यासाठीच नव्हे तर औषध म्हणूनसुध्दा मध वापरला जात असे. आता तर तो केवळ औषध म्हणून वापरला जातो. आयुर्वेदात तर मधाला मोठे महत्त्व दिले जाते. आपल्या शरीरातल्या चयापचय क्रिया सुरळीत व्हाव्यात यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मध आणि पाण्याचे मिश्रण प्यावे असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. अशा प्रकारे मध प्राशन केल्यास पचनशक्ती सुधारते असा आयुर्वेदाचा दावा आहे. परंतु सध्या मधाच्या बाबतीत काही अहितकारक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत.

एखादे मूल जन्माला आल्याबरोबर त्याला मध चाटवला जातो. तोही सोन्याच्या अंगठीने. या माध्यमातून त्याच्या इवल्याशा शरीरात मधासारखा रोगप्रतिकारक घटक तर जातोच पण सोन्यामुळे थोडेसे सोने शरीरात जाऊन त्याचा मंेंदू तल्लख बनतो असा आपला समज आहे. मात्र अलीकडच्या काळात डॉक्टर या प्रथेला विरोध करत आहेत. एक वर्षाच्या आतील कोणत्याही बालकाला मध देता कामा नये असा डॉक्टरांचा सक्त आदेश आहे. त्यामुळे मुलाच्या शरीरामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात. दोन वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकाला मात्र मधाची कसलीही बाधा होत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment