दणकून ट्रेंड होतोय राफेल पान मसाला


दीर्घकाळ लोंबकळलेला राफेल सौदा पूर्ण होऊन आता फ्रांसकडून पहिले राफेल लढाऊ विमान भारताच्या ताब्यात आले आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी विमानाची पूजा केल्यावरून सोशल मिडियावर मिम्सचा पूर आला असतानाच आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ राफेल बद्दलचाच असला तरी तो आहे राफेल नावाने बाजारात येत असलेल्या पान मसाल्याचा. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

उत्तरप्रदेशातील R AMP नामक एका कंपनीने हा पान मसाला उत्पादित केला आहे असे समजते आहे. बाजारात अजून हा पान मसाला आलेला नाही मात्र तो लवकरच येणार आहे, असे ही जाहिरात बनविणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्याकडून सांगितले गेले आहे मात्र त्याच्या खरेपणाची पुष्टी होऊ शकलेली नाही. या व्हिडीओ मध्ये दोन लढवू विमाने एका भल्या मोठ्या राफेल पान मसालाच्या पॅकेट भोवती फेऱ्या मारताना दिसत असून हा व्हिडीओ ११ सेकंदाचा आहे. त्याला जान जुबान की अशी टॅगलाईन सुद्धा दिली गेली आहे.

या व्हिडीओ नंतर सोशल मिडियावर अनेक मजेदार प्रतिक्रिया आल्या असून प्रदीप नावाच्या युजरने ज्यांना राफेल आल्याने त्रास होत आहे त्यांनी हा पानमसाला खावा आणि तोंड बंद ठेवावे असे लिहिले आहे तर अन्य एकाने जो खाये पायलट बन जाये अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने राहुल गांधी गेली पाच वर्षे राफेलवरून भाष्य करत आहेत त्यांनी हा मसाला खाल्ला तर त्यांना प्रत्येक चौकीदार चोर आहे असे भासेल असेही म्हटले आहे.

Leave a Comment