चीनी अभिनेता जॅकी हंगचे महांकालेश्वराला साकडे


चीन हॉगकॉंगचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता जॅकी हंग याने नुकतीच उज्जैनच्या प्रसिद्ध महांकालेश्वर मंदिराला भेट देऊन तेथे विधिवत पूजाअर्चना केली. यावेळी त्याने तासभर रुद्राभिषेक करून भस्म आरती मध्येही भाग घेतला. जॅकीचा नवा चित्रपट चेसिंग ड्रीम ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून हा चित्रपट यशस्वी ठरवा अशी प्रार्थना त्याने यावेळी महांकालेश्वराला केली असे समजते. जॅकी त्याचा मित्र प्रदीप शेट्टी याच्यासमवेत येथे आला होता. जॅकी शिवभक्त आहे आणि भारतातील अनेक शिवमंदिरांना त्याने यापूर्वीही भेटी दिल्या आहेत. मात्र चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून त्याने प्रथमच महांकालेश्वर महादेवाची करूणा भाकली असे समजते.

उज्जैनचा महांकालेश्वर जगप्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे स्थान असून ते जागृत समजले जाते. उज्जैनच्या या मंदिरात देशविदेशातून भाविक दर्शनासाठी येतातच पण अनेक राजकीय नेते, बॉलीवूड सेलेब्रिटी, व्हीआयपी सुद्धा येथे येऊन या जागृत देवाचे दर्शन घेतात.

Leave a Comment