आता थेट कॉम्युटरद्वारेच करा कॉलिंग

मायक्रोसॉफ्ट विंडोजने 10 इनसाइडर प्रीव्यू बिल्ड 18999 (20H1) चे नवीन अपडेट आणले आहे. या अपडेटमध्ये एक खास फीचर देण्यात आलेले आहे. या अपडेटनंतर विंडोज 10 युजर्स आपल्या कॉम्प्युटर्सद्वारेच फोन करू शकतील. मात्र यासाठी युर फोन अॅप डाउनलोड करावे लागेल. हे मायक्रोसॉफ्टचेच एक अॅप आहे.

नवीन अपडेटनंतर डेस्कटॉपमध्येच डायलर आणि कॉन्टॅक्ट सपोर्ट ऑप्शन मिळेल. कॉलिंगबरोबरच तुम्ही कॉलिंग हिस्ट्री देखील कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपवर पाहू शकाल. तसेच तुम्ही कॉल रिजेक्ट केल्यावर डेस्कटॉपद्वारे एक मेसेज पाठवण्याचा पर्याय देखील मिळेल.

मायक्रोसॉफ्टच्या साइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता तुम्हाला वारंवार येणाऱ्या कॉलसाठी फोन उचलण्याची गरज नाही. तुम्ही डेस्कटॉपवरच स्पीकर आणि मायक्रोफोन सुरू करून बोलू शकता.

डेस्कटॉपद्वारे कॉलिंग करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये युर फोन अॅप असणे गरजेचे आहे. हे अपॅ अँड्राइड नूगट 7.0 च्या वरील व्हर्जनमध्ये चालते. मायक्रोसॉफ्ट या फिचरचे टेस्टिंग करत असून, लवकरच हे अपडेट लाँच करण्यात येईल.

Leave a Comment