ट्विटरवर #Inktober सर्च करा, नक्कीच काहीतरी भन्नाट बघायला मिळेल

ऑक्टोंबरमध्ये एकीकडे सर्वत्र आनंदात सण साजरे केले जात आहेत. तर सोशल मीडियावर देखील या महिन्याची आतुरतेने वाट पाहिली जाते. तुमच्या लक्षात आले असेल की, सध्या इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आर्टिस्ट्स सुंदर ड्रॉइंग्स शेअर करत आहेत. पांढऱ्या कागदावर  इंक (शाई) पासून बनवण्यात आलेली चित्र #Inktober आणि #Inktober2019 बरोबर पोस्ट केले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, हे #Inktober नक्की आहे तरी काय ?

2009 मध्ये जेफ पार्करने केली होती सुरूवात –

दरवर्षी ऑक्टोंबरमध्ये जगभरातील कलाकार पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाने चित्र बनवतात. याची सुरूवात 2009 मध्ये इलेस्ट्रेटर आणि एनिमेटर जेफ पार्करने केली होती. पार्कर त्यानंतर दर वर्षी ऑक्टोंबर महिन्यात याची घोषणा करतो. तो काही शब्द अथवा म्हणीची लिस्ट शेअर करतो. आर्टिस्ट्स त्यातील एखादा शब्द निवडून त्याचे चित्र काढू शकतात.

https://twitter.com/wantipasti/status/1181963105560956929

चँलेज नाही, अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न –

जेफने #Inktober ची एक वेबसाइट देखील बनवली आहे. त्याने त्यावर लिहिले की, कोणीही Inktober करू शकते. केवळ पेन उचला आणि ड्रॉइंग सुरू करा. वेबसाईटनुसार, #Inktober कोणतेही चँलेज नसून, अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न आहे.

कोणताही नियम नाही –

जेफ नुसार, #Inktober मध्ये कोणताही विजेता निवडला जात नाही. केवळ चित्र बनून दोन हॅशटॅग वापरून शेअर करा. तुम्ही जे काही करता ते जगाला दाखवा.

 

Leave a Comment