मैदानात उतरताच कोहलीने मोडला गांगुलीचा विक्रम

दक्षिण आफ्रिकेविरूध्द आजपासून पुण्यात सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहलीने 50 कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळण्याची कामगिरी केली आहे. याचबरोबर विराटने गांगुलीचा विक्रम देखील मोडला. विराट आधी केवळ महेंद्रसिंग धोनीनेच 50 पेक्षा अधिक कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.

सौरभ गौगुलीने 49 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. तर 2008 ते 2014 या काळात महेंद्र सिंग धोनी 60 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

धोनी, विराट आणि गांगुली यांच्या व्यतरिक्त सुनील गावस्कर आणि मोहम्मद अजहरूद्दीन यांनी 47 कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळले आहे. तर मंसूर अली खान पाटौदी यांनी 40 सामन्यात नेतृत्व केले आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मागील तीन वर्षांपासून कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 49 पैकी 29 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामने ड्रॉ राहिले.

विराट भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. कोहलीने आतापर्यंत 49 सामन्यांमध्ये 29 सामन्यात विजय मिळवला आहे तर 10 मॅचमध्ये भारताचा पराभव झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने 60 पैकी 27 कसोटी सामने जिंकले आहेत. तर सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने 21 सामने जिंकले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर साउथ आफ्रिकेच्या ग्रॅहम स्मिथने सर्वाधिक 109 कसोटी सामन्यामध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यात 53 सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या एलन बॉर्डर यांनी 93 कसोटी सामन्यात नेतृत्व करताना 32 सामन्यात विजय मिळवला आहे.

Leave a Comment