जस्टिन बिबरने शेअर केलेला हा भन्नाट फोटो एकदा बघाच

पॉपस्टार जस्टिन बिबरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भन्नाट आणि तेवढाच खतरनाक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक जहाज आणि त्याच्या खाली खूप मोठा व्हेल शार्क दिसत आहे. माशाची सर्वात मोठी प्रजाती असलेला व्हेल शार्क बोटीच्या बरोबर खाली पोहताना दिसत आहे. फोटो बघून असे वाटते की, मासा बोट गिळून टाकेल.

जस्टिन बिबरने फोटो पोस्ट करत लिहिले की, हा फोटो खरा आहे ! व्हेल शार्क समुद्रातील सर्वात मोठा मासा आहे. फोटो बघून अनेकांना हा खोटो असल्याचे वाटू शकते. मात्र जस्टिन बिबरने म्हटल्याप्रमाणे हा फोटो खरा आहे. मात्र पुर्ण सत्य वेगळे आहे.

हा फोटो 2018 मध्ये टॉम कॅनोनने काढला आहे. हा फोटो ऑस्ट्रेलियातील निंगालो रीफ येथील आहे. मात्र हा फोटो ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच फोर्स्ड परसेप्शन टेक्निकचा वापर करून काढण्यात आलेला आहे.

फोर्स्ड परस्पेटिक्व हे फोटोग्राफीचे असे तंत्र आहे, ज्यामध्ये फोटोमधील कोणतीही वस्तू मोठी, छोटी, लांब अथवा जवळ दाखवली जाते. जसे की, ताजमहाल जवळ उभे राहून काढण्यात आलेल्या फोटोसाठी फोर्स्ड परस्पेक्टिव तंत्राचा वापर केला जातो. ज्यामुळे ताजमहाल छोटा आणि फोटोमधील व्यक्ती मोठी दिसते.

टॉम कॅनोनने देखील या फोटोमध्ये तसेच केले आहे. ज्यामुळे शार्क मासा जवळ आणि मोठा दिसत आहे. टॉमने सांगितले की, जेव्हा हा फोटो काढला त्यावेळी शार्क काही सेंटीमीटरवरच होती तर बोट खूप लांब होती.

Leave a Comment