या प्रकारे तुम्हीही 14 वर्षात बनू शकता कंपनीचे सीईओ

आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी आणि स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रत्येक जण कठोर मेहनत घेत असतो. मात्र यश खूप कमी जणांना मिळते.  जबाबदारी काम करणे आणि आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी सर्व प्रयत्न करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बिझनेस जगतामध्ये यशाला जोखीमेशी जोडले जाते. तुम्हा आश्चर्य वाटेल की, एखाद्या एग्झिक्यूटिवला पहिल्या नोकरीपासून ते सीईओ बनण्यासाठी सरासरी 24 वर्ष लागतात. मात्र धोका पत्करून निर्णय घेणारे एग्झिक्यूटिव 14 वर्षांमध्येच सीईओ पदापर्यंत पोहचतात.

14 वर्षांमध्ये बनू शकता सीईओ –

सीईओ जिनोम प्रोजेक्टने 10 वर्ष याचा अभ्यास केला आहे. त्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जोखीम स्विकारणारे एग्झिक्यूटिव 14 वर्षांमध्ये कंपनीचे सीईओ बनतात. 17 हजार एग्झिक्यूटिवनी या सर्वेक्षणामध्ये भाग घेतला होता. सर्वेक्षणामध्ये 2 हजार सीईओ देखील सहभागी होते.

जोखीम योग्य प्रकारे हाताळणे हे सीईओंचे वैशिष्ट्य आहे. जोखीम घेतल्याने एग्झिक्यूटिवला स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळत असते. जोखीम स्विकारून कर्मचारी एक नवीन सुरूवात करू शकतो व दाखवू शकतो की, त्याच्यामध्ये किती क्षमता आहे.

या अभ्यासात जोखीम परिस्थितीमध्ये दिवाळखोरी सारखी परिस्थिती हाताळणे, तसेच एखादा व्यवसाय चांगला चालत नाही तो सांभाळणे.  व्यवसायाचा फायदा वाढवणे यासारख्या गोष्टी पाहण्यात आल्या. तसेच जोखीम स्विकारून योग्य कामगिरी न केल्यास नोकरी देखील जाऊ शकते.

महिलांसाठी जोखीम स्विकारणे अधिक महत्त्वाचे –

पुरूषांच्या तुलनेत महिलांसाठी जोखीम स्विकारणे अधिक महत्त्वाचे आहे. सर्वेक्षणानुसार, 85 वरिष्ठ महिला एग्झिक्यूटिवने यशासाठी जोखीम स्विकारणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. जेव्हा महिला त्या कामासाठी तयार नाही असे समजते व त्याही परिस्थितीमध्ये काम यशस्वीरित्या पार पाडते ते अधिक महत्त्वाचे ठरते.

अभ्यासात हे देखील दिसून आले की, महिला कोणतेही नवीन पद स्विकारण्यापुर्वी त्यासाठी स्वतःला तयार करतात. मात्र प्रत्येक वेळेस हे शक्य नसते. अनेक वेळा नवीन पद मिळाल्यानंतर महिला भूमिका स्विकारण्यासाठी तयार नसतात. जबाबदारीच्या हिशोबाने त्या स्वतःमध्ये बदल घडवतात.

 

 

 

Leave a Comment